MGID Header Code
Code End

गणेशम फेज २ सोसायटीत आग; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..

 

शहरातील 'गणेशम फेज २' सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. आगीचे वृत्त समजताच नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी अत्यंत तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केले. या घटनेत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका रूममध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत दोन लहान मुले अडकल्याचे समजताच जवानांनी जीवाची बाजी लावत तातडीने बचावकार्य सुरू केले आणि त्या दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली.

​सध्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

​मात्र, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले धाडस व वेगवान हालचालींमुळे संभाव्य जीवितहानी टळण्यास मोठी मदत झाली आहे. प्रशासनाकडून आणि अग्निशमन दलाकडून आगीवर लवकरच पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात येईल,अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी नगरसेविका सौ.अनिताताई काटे,नगरसेविका सौ.कुंदाताई भिसे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने