समाजभूषण सन्मान सोहळा उत्साहात
चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील गणेश मंदिर श्री दत्तनगर प्रतिष्ठान प्रांगणात धनश्री हॉस्पिटल, मोशी, अग्रवाल आय हॉस्पिटल, मोशी व आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशन ( ACDA ) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरा सह गणेशोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी, आळंदी नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डॉ. निलेश रंधवें, डॉ. मनिषा रंधवे , आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन अध्यक्षा डॉ ज्योत्स्ना आवारी, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा बंडू नाना काळे, सुलतानभाई शेख, हमीद शेख, गोविंद ठाकूर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नागरिकांची तपासणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे "समाजभूषण सन्मान" सोहळा होय. समाजहितासाठी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आळंदी परिसरातील विविध मान्यवर व्यक्तींचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. या सन्मानामुळे समाजसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले.
तसेच डॉ. सोनवणे लहान मुलांचे व दातांचे हॉस्पिटल यांच्या वतीने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक बालकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे व कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनश्री हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएश, श्री दत्तनगर प्रतिष्ठान, सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिक यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे डॉ. ज्योत्स्ना आवारी यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे आरोग्य जनजागृती, समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव आणि बालकांच्या कला गुणांना प्रोत्साहन असे तीन महत्त्वपूर्ण उद्देश एकाच व्यासपीठावर साध्य झाले. कार्यक्रमाची सांगता यशस्वी रीत्या उत्साहात झाली.
समाजहितासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजभूषण सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात प्रेरणादायी योगदानाबद्दल “समाजभूषण सन्मान” प्रदान करून अर्जुन मेदनकर, अर्चना घुंडरे, गौतम पाटोळे, आरती मोरे, रवींद्र गव्हाणे, अनिल वहिले, अंजना खेडकर, रुख्मिणी मोरे, आरिफ शेख यांचा सन्मान उत्साहात करण्यात आला.
या उपक्रमांचे यशस्वितेसाठी आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आवारी, ,उपाध्यक्ष डॉ. निखिल सोनवणे, सचिव डॉ. सचिन सुदडे, सहसचिव डॉ.अशोक रहाणे, खजिनदार डॉ. रविन्द्र बदरखे, सहखजिनदार डॉ.अमोल देवकर, दत्तनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे यांचेसह आळंदी चर्होली डॉक्टर्स असोसिएशन सर्व पदाधिकारी , सदस्य यांनी परिश्रम घेतले. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून ऋण व्यक्त करीत मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन च्या आरोग्य विषयक कार्याचा गौरव करण्यात आला. दत्तनगर प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रमाचे ही मान्यवरांनी मनोगतातून कार्य गौरव केला. समारोपात श्री गणेश आरती, पसायदान, उपस्थित मान्यवरांचा दत्तनगर प्रतिष्ठान तर्फे श्रीफळ प्रसादभेट देऊन सत्कार करण्यात आला.
