MGID Header Code
Code End

प्रभाग क्रमांक ११ भिमशक्तीनगर येथील चोकअप झालेली ड्रेनेज लाईन तातडीने नव्याने टाकण्याबाबत फ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी मा. अतुल पाटील यांना निवेदन

 


पिंपरी चिंचवड ; प्रभाग क्रमांक ११ मधील भिमशक्तीनगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन पूर्णपणे चोकअप झालेली असून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असल्याचे चित्र आहे.

पूर्वी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन या पूर्णपणे मातीने भरलेल्या असल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नाही. परिणामी सांडपाणी रस्त्यावर पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

या गंभीर समस्येचा विचार करून आज फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी मा. अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सदर विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

आपला जनसेवक,
विशाल कसबे

थोडे नवीन जरा जुने