फेरीवाला कायद्याला गती देऊ - आयुक्त श्रावण हर्डीकर

 


फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व  समिती सदस्यांची  आयुक्तांशी चर्चा.

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांचे नियोजन करावे यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व समिती सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आचारसंहिता कालावधीमध्ये काही कालावधी काम थांबलेले होते, मात्र आता बैठकीचे आयोजन करून लवकरच फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करू असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पथविक्रेता समिती सदस्य व महासंघाचे पदाधिकारी यांना दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले असून यामध्ये अनेक विक्रेत्यांनी प्रमाणपत्र शुल्क चौदाशे रुपये भरलेले आहेत. त्यांना फेरीवाला प्रमाणपत्र दिले जात नाही ते त्वरित देण्यात यावे. तसेच समितीची बैठक घेऊन कामकाज सुरू करावे, त्याचबरोबर हॉकर्स झोनच्या जागांची निश्चिती करण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे आपण  क्षत्रिय कार्यालय स्तरावरती बैठक आयोजित करावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाचे पालन करण्यात यावे. अ ब क ड ई फ ग ह या आठही प्रभागांमध्ये अधिकाऱ्यांना आदेश करून जागा निश्चिती करणे गरजेचे आहे असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

यावेळी सदस्यांनी होत असलेली कारवाई थांबवण्यात यावी आणि शुल्क भरण्यापासून वंचित असणारे उर्वरित विक्रेत्यांचे शुल्क चौदाशे रुपये भरून घेण्यात यावे विविध मागण्यांचे निवेदन देऊन आयुक्तांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर आयुक्त म्हणाले, आवश्यक ती कार्यवाही सुरू केलेली असून लवकरच आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची बैठक घेऊन योग्य नियोजन करू. 

यावेळी  महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका समिती सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, सदस्य अलकाताई रोकडे, सदस्य किसन भोसले,महासंघाचे  राजेश माने, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे, उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने