तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'गुगल'ने भारतासाठी आपल्या खजिन्याचे दार उघडले आहे.

 


आंतराष्ट्रीय:दिनांक २२ फेब्रुवारी :  'गुगल'चे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारत-अमेरिकादरम्यान एआय कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी समुद्राखालील नवा केबल मार्ग उभारण्याची घोषणा केली आहे.याचवेळी त्यांनी २ कोटी सरकारी कर्मचारी आणि १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआयचे खास प्रशिक्षण देण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पिचाई यांनी 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'मध्ये ही माहिती दिली. भारताच्या प्रगतीत तंत्रज्ञान कशी क्रांती घडवू शकते, याबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

भारतामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, लवकरच एखादी जागतिक पातळीवरील मोठी 'आयटी' किंवा 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) कंपनी इथल्या मातीतून उभी राहील. भारतीय तरुणांमध्ये असलेली जिद्द आणि इथली बदललेली बाजारपेठ पाहता, आता प्रगतीच्या मार्गावर कोणताही अडथळा उरलेला नाही.

भारत जागतिक दर्जाच्या एआय कंपन्या उभ्या करू शकतो. मला यात कोणतीही अडचण दिसत नाही. भारत यासाठी अत्यंत चांगल्या स्थितीत आहे, असेही सुंदर पिचाई म्हणाले.

१. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) येथे १५ अब्ज डॉलर्स (सुमारे १ लाख ३५ हजार कोटी) खर्चून एक भव्य 'एआय हब' उभारणार.

२. 'कर्मयोगी भारत' उपक्रमांतर्गत देशातील १८ भाषांमधील ८०० जिल्ह्यांतील सुमारे २ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार.

३. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून १.१ कोटी विद्यार्थ्यांना आणि १० हजार शाळांना 'जनरेटिव्ह एआय'ची मदत.

४. एआयच्या मदतीने रोगांचे लवकर निदान करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना मदत करणे आणि स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देणे, यावर गुगलचा विशेष भर.

५. एआय आता १० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना तंत्रज्ञान वापरणे सोपे.

६. संशोधकांसाठी 'एआय फॉर सायन्स इम्पॅक्ट चॅलेंज' जाहीर. यात २७२ कोटी रुपयांची मदत संशोधकांना करणार.

मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

'इंडिया एआई इम्पॅक्ट शिखर संमेलन २०२६'चे दिमाखदार उद्घाटन गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राजधानी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे हा सोहळा रंगणार आहे. यासाठी आलेल्या जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी स्वागत केले.

चिनी 'रोबो डॉग'मुळे विद्यापीठ पडले ताेंडघशी

एआय समिटमध्ये आपल्या संशोधनाचा डंका वाजवू पाहणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाची मोठी फजिती झाली. चीनमध्ये तयार झालेल्या 'रोबोटिक डॉग'ला स्वतःचे संशोधन सांगणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाने झालेल्या प्रखर टीकेनंतर जाहीर माफी मागितली आहे. या प्रकारानंतर सरकारने कडक पावले उचलत विद्यापीठाचा स्टॉल तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत

थोडे नवीन जरा जुने