पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : पर्यावरण जनजागृती तसेच सायकल वापरातून आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हिरकणी मावळे रायडर्स या समूहाने चिंचवड ते पुणे – तुळजापूर मार्गे अक्कलकोट असा सुमारे ४०० किलोमीटरचा दिवस-रात्र सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या मोहिमेत दहा सायकलपटू (महिला व पुरुष) सहभागी झाले होते. अत्यंत खडतर असलेला हा प्रवास सर्व सायकलपटूंनी मोठ्या जिद्द, चिकाटी व उत्साहाने पूर्ण केला.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थ मठ, चिंचवड येथे या सायकलपटूंचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सायकल मोहिमेत सहभागी सायकलपटू पुढीलप्रमाणे –
प्रज्ञा अजगर, सोनाली कदम, अपर्णा अष्टीकर, ऋतुजा शेटे, हर्षल बोरकुले, मकरंद नरवडे, मुकुंद पाटे, प्रदीप साळी, स्वराज गावडे, दिनेश निकुंभ.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस फ्रेंड वेल्फेअर संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष तसेच स्वामी समर्थ मठाचे प्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित होते.
यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे, अध्यक्ष मधुकर बच्चे,, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, ॲड. विलास कडेकर, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, धनंजय मांडके, उल्हास दाते, अर्जुन पाटोळे, अपर्णा कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, बाळासाहेब जगताप, श्रीनिवास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण व आरोग्यासाठी सायकलचे महत्त्व या विषयावर जनजागृती करणारी ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल फाउंडेशनतर्फे सर्व सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला. सत्कारप्रसंगी सायकलपटूंनी आपल्या भावना व्यक्त करत वुई टुगेदर फाउंडेशनचे आभार मानले.

