!-- afp header code starts here --> PCMC : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तर्फे २०२६ चे राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ जाहीर

PCMC : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तर्फे २०२६ चे राष्ट्रीय व राज्यस्तरीय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ जाहीर

 


पिंपरी चिंचवड : राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा या विचारत्रयीचा जागर राखत समाजजीवनात भरीव व दीर्घकालीन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे १८ वे वर्ष साजरे होत आहे. २०२६ सालचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वा. ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, आकुर्डी, पुणे येथे भव्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तेलंगणातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करणारे श्री रामावत नर्यानाईक (नलगोंडा, तेलंगणा) यांना जाहीर झाला आहे. संघटनशक्ती, समाजजागृती आणि धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांची दृढ जपणूक या माध्यमातून त्यांनी विविध स्तरांवर कार्य उभारले असून ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवर त्यांचा गौरव केला जात आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार भिल्ल समाजामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जागृतीचे कार्य करणारे श्री गजानन छोटू सोलकर (अकोला, महाराष्ट्र) यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही समाजप्रबोधन, पारंपरिक संस्कारांचे पुनरुज्जीवन, उत्सव-परंपरांचा प्रसार आणि ग्रामस्तरावर संघटनात्मक कार्य यांमुळे त्यांनी समाजात आत्मविश्वास व सांस्कृतिक जाणीव निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले असून सामाजिक समरसतेचा संदेश बळकट झाला आहे.

या सोहळ्यात पुरस्कार प्रदान आधुनिक सनातनी चिंतक, लेखक व तरुण पत्रकार डॉ. गौतम खट्टर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वैदिक परंपरा, सांस्कृतिक अस्मिता आणि युवकांमध्ये राष्ट्रचेतना जागविण्याचे कार्य त्यांनी देशभरात प्रभावीपणे उभारले आहे. त्यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा वैचारिक ऊर्जा व प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे.

“की घेतले न हे व्रत अम्हीं अंधतेने… लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने…” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा दीप प्रज्वलित ठेवत आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी, युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे, कोषाध्यक्ष विकास देशपांडे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क : ८४४६४२२९६५ (कार्यालय)

शिवानंद चौगुले : ९८५००९९९२१

थोडे नवीन जरा जुने