!-- afp header code starts here --> Pune : गोविंद नगर, आंबेठाण येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न

Pune : गोविंद नगर, आंबेठाण येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न

 


पुणे (शिवानंद चौगुले) :आंबेठाण येथील गोविंद नगर सार्वजनिक शिवजयंती मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास परिसरातील महिला मंडळ, पुरुष मंडळ तसेच लहान–थोर नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवत सोहळ्याची शोभा वाढवली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. तसेच प्रेरणादायी भाषणांमधून स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देण्यात आला. संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता.

या सोहळ्यास पुणे जिल्हा स्थायी समिती सदस्य श्री. शरदराव बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनिता ताई बुट्टे पाटील, आंबेठाणचे सरपंच श्री. दत्ता शेठ मांडेकर तसेच पंचायत समिती सदस्य सौ. श्रद्धा ताई मांडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजप सहकार सेल आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. माधव अप्पासाहेब मनोरे, गोविंद नगरचे आधारस्तंभ श्री. गोविंद शेठ घाटे व श्री. संपत शेठ बोईनवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राहुल जयपात्रे, सूर्यकांत आप्पा हिप्परगे, कपिल शेट उगले, अजित ठोंबरे, बालाजी कापसे आणि विकास तांबिले यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. शिवजयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. महाप्रसाद व्यवस्थापनात रामदास विश्वासी, पंकज मिरगुले, परमेश्वर गाताडे, विकास ठाकरे, विठ्ठल ताडपले, ज्ञानेश्वर पाटील, स्वप्निल बनगर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

या उत्सवामुळे गोविंद नगर परिसरात एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवजयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.


थोडे नवीन जरा जुने