पिंपरी चिंचवड :श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान,श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघ,श्री स्वामी समर्थ महिला मंडळ,श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ आणि श्री स्वामी समर्थ युवा मंच शिवतेजनगर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोक सभेस प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला मंडळ, सेवेकरी मंडळ, युवा मंचचे सदस्य तसेच पूर्णनगर व शिवतेजनगर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, माजी नगरसेवक विनायक रनसुभे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिणारायण शेळके, महिला मंडळ अध्यक्ष सारिका रिकामे, सेवेकरी प्रमुख क्षमा काळे, युवा मंच अध्यक्ष चैतन्य बनकर, प्रा. कल्याण वाणी सर, किशोर थोरात, शोभा नलगे काकू, कांचन नेवे, विनोद गुप्ता, तेजस्विनी बढे, अनिता दत्ता, अशोक सूर्यवंशी, पुरुषोत्तम बोरसे, अर्चना तोंडकर आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
शोक सभेदरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली तर श्रद्धांजली व्यक्त करताना अनेकांना अश्रू अनावर झाले.lसंपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते.
