MGID Header Code
Code End

शहीद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन

 


पिंपरी चिंचवड  दि.२३ - देशासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे चिंचवड येथे कष्टकरी कामगारांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांतिकारी विचारांनी अन्याय, शोषण आणि असमानतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. भगतसिंग यांनी श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी विशेष काम केले होते. कामगारांच्या हक्कासाठी व उभं राहण्याची ताकद त्यांच्या बलिदानातूनच मिळाली.

शहीदांचे बलिदान आपल्या कृतीतून जिवंत ठेवणे हीच खरी आदरांजली आहे. कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा संकल्प करूया असे मग कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

यावेळी  निमंत्रक बालाजी लोखंडे,लाला राठोड उपाध्यक्ष राजेश माने, सुनील भोसले सीमा धंदर,अश्विनी शिंदे सुवर्ण विधाते,सविता खिलारे,गंगा मिर्गल, दीपाली वसंतकर, सरिता पाटील,रेखा शिंदे, संगीता पोते,रोशन  बागी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने