MGID Header Code
Code End

कादरीया वेलफेअर सोसायटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न


जुन्नर (रफिक शेख) : गेल्या २८ वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे आज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात चार जोडप्यांचे सामुदायिक विवाह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवदांपत्यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोसायटीचे अध्यक्ष रऊफ खान यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी नवविवाहितांना शुभेच्छा देत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.



या सोहळ्यास अनिस कुट्टी, सईद पटेल, नगरसेवक अकिब इनामदार, राजू भाई, सलमा सय्यद, सिम्मी शेख, परवीन, हजरा इनामदार, सना तकी आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सामुदायिक विवाहामुळे गरजू कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत असून समाजात एकोप्याचा आणि सहकार्याचा संदेश दिला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


थोडे नवीन जरा जुने