पिंपरी-चिंचवडला विधान परिषदेची संधी द्या; योगेश बहल यांच्या नावाचा कार्यकर्त्यांकडून आग्रह

 


मुंबई/पिंपरी: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि राज्यसभा खासदार पार्थदादा पवार यांची भेट घेतली. मुंबईतील 'देवगिरी' निवासस्थानी पार पडलेल्या या भेटीत, शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबतचे निवेदन एकमताने देण्यात आले.

सातवेळा नगरसेवक अन् अभ्यासू नेतृत्व

योगेश बहल यांनी १९९२ पासून सलग सातवेळा निवडून येत एक 'अभ्यासू नगरसेवक' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आतापर्यंत शहराध्यक्ष, महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी व महापालिकेत सत्ता आणण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते.

शहराच्या विकासासाठी विधान परिषदेची गरज

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ असून केवळ एक आमदार (पिंपरी) राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून आरक्षित असल्याने बहल यांना संधी मिळालेली नाही. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय पातळीवर प्रभावी काम करण्यासाठी शहराला विधान परिषदेच्या माध्यमातून हक्काचा प्रतिनिधी मिळणे आवश्यक आहे.

अल्पसंख्याक आणि अनुभवी चेहऱ्याला संधी

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि 'आयटी हब' असून ते एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. अशा शहरात योगेश बहल यांच्यासारख्या प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या आणि अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला संधी दिल्यास शहरात सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी शिष्टमंडळात डॉ. वैशाली घोडेकर, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, पंडित गवळी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, मनिषा लांडे, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतिक्षा जवळकर-लांघी, दिप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, माऊली मोरे, रविंद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दिपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने