MGID Header Code
Code End

टेडएक्स- डीवायपीडब्ल्यूएस युथ कार्यक्रमात अदिती पोहनकर करणार मार्गदर्शन

 


 पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आणि सिम्प्लिफाय सक्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या टेडएक्स -डी वाय पी डब्ल्यू एस युथ-२०२६ कार्यक्रमात अभिनेत्री आदिती पोहनकर तरुणांना मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम दि. ३१ मे रोजी स. १० वा, आकुर्डी येथील डी वाय पाटील शैक्षणिक संकलातील शांताई सभागृहात होणार आहे. 

 याप्रसंगी डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त  तेजस पाटील, गायिका अन्वेशी जैन, चित्रपट  निर्माते दिग्दर्शक अनंत महादेवन , बालाजी जयसीलन, दीपक वाणी , कर्नल मिकी ओबेरॉय , जुही दामोदर , मणी कंदन एम.एस, डॉ. अमित सुरतकर  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.अशी माहिती डॉ डी वाय पाटील वर्ल्ड स्कुलचे अध्यक्ष  डॉ.भरत  पाटील यांनी दिली.

 बर्लीन पॅकेजिंग आणि प्रोकॉनव्हीज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

थोडे नवीन जरा जुने