पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली (घरकुल) येथील ११४ फळ-भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ, कटलरी, स्टेशनरी व इतर व्यावसायिकांसाठी आज दिनांक २९ जून २०२६ रोजी घरकुल येथील सांस्कृतिक भवन येथे पारदर्शकपणे 'लकी ड्रॉ' पद्धतीने गाळे वाटप करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे गोरगरीब कष्टकरी फेरीवाल्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने 'रामराज्य' अवतरले आहे, अशी भावना टपरी पथारी हातगाडी पंचायत व नॅशनल फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास टपरी पथारी हातगाडी पंचायतीचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष,अशोक मगर, माजी अध्यक्ष सुधाकर दुरी, अविनाश गवळी,दशरथ शिंदे, राम पल्हारी,बारगल्ली गावडे,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
" भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक नगरसेवक निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड आणि योगिताताई नागरगोजे, रिटाताई सानप,यांनी या प्रक्रियेसाठी प्रामाणिक प्रयत्न व पाठ पुरवठा केला.
तसेच, महापालिका आयुक्त आणि 'फ' क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह संपूर्ण प्रशासनाचे डॉ. बाबा कांबळे यांनी अभिनंदन केले.
प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पुनर्वसन:
घरकुल भागात २०० हून अधिक टपरी, पथारी, हातगाडी धारक फळभाजी विक्रेते व्यवसाय करत आहेत. पहिल्या टप्प्यात ६x८ फुटांचे ओटे बांधून ११४ फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पुढील काळात प्रयत्न करून, उर्वरित फेरीवाल्यांचे देखील लवकरात लवकर विविध भागांत पुनर्वसन करण्यात येणार आहे. आता या कष्टकऱ्यांना कायद्याचे संरक्षण प्राप्त झाले असून, त्यांच्यावर कोणतीही अन्यायकारक कारवाई होणार नाही, अशी ग्वाही डॉ. बाबा कांबळे यांनी दिली.
फेरीवाला धोरण आणि ऐतिहासिक संदर्भ:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००७ मध्ये देशातील पहिला फेरीवाला कायदा डॉ बाबा कांबळे यांच्या प्रयत्नाने मंजूर केला होता. त्यानंतर २००९ मध्ये महाराष्ट्र सरकारने कायदा मंजूर केला, आणि २०१४ चा केंद्र सरकारचा 'फेरीवाला व्यवसाय विनियमन कायदा' या आधारे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. डॉ. बाबा कांबळे २००५ सालापासून या प्रश्नावर सातत्याने काम करत असून, त्यांच्या प्रयत्नांतूनच शहरात या कायद्याची अंमलबजावणी यशस्वी होत आहे. २००७ पासून डॉ. बाबा कांबळे महापालिकेत फेरीवाला समितीचे शासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचे स्वागत:
पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून फेरीवाल्यांच्या प्रश्नांना गती मिळाली असून कष्टकऱ्यांना न्याय मिळत आहे.
भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, शत्रुघन बापू काटे, यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा, वतीने कष्टकऱ्यांना, कायदेशीर मदत व सहकार्य केले जात आहे,
या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल महापालिकेचे पदाधिकारी,तसेच पिंपरी चिंचवड शहराचे आमदार शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे, शहराचे महापौर रवीभाऊ लांडगे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष, अभिषेक बारणे, आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींचे डॉ. बाबा कांबळे यांनी विशेष आभार मानले, आहेत. अशाच प्रकारची पारदर्शक प्रक्रिया शहरातील उर्वरित सर्व भागांत राबवावी, जावी अशी मागणीही त्यांनी या निमित्ताने केली आहे.
"
