!-- afp header code starts here --> माऊलींचे रथाला बैलजोड सेवेचा वाद अखेर मिटला

माऊलींचे रथाला बैलजोड सेवेचा वाद अखेर मिटला

 


 आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढ पायी वारी पालखी सोहळ्यासाठी बैलजोड सेवा देण्याच्या मागणीतील तिन्ही  अर्जा नुसार तीनही अर्जदार यांना सेवेची संधी देऊन बैल जोड निवड समितीने अखेर वाद मिटविला आहे. आळंदी येथून श्रींचा पालखी सोहळा निघाल्या नंतर येताना व जाताना पुणे जिल्हा, सातार जिल्हा, सोलापूर जिल्हा या प्रमाणे सेवा देण्याची संधी आळंदीतील रानवडे परिवारास देण्यात आली आहे. 

या नुसार अनुक्रमे हर्षवर्धन रानवडे पुणे जिल्हा, उमेश रानवडे सातारा जिल्हा, तुळशीराम रानवडे सोलापूर जिल्हा या प्रमाणे पालखी सोहळ्यात त्या त्या जिल्ह्यातून जाताना व येताना श्रींचे पालखी रथाला बैलजोड सेवा देणार आहे. अशी माहिती बैलजोड निवड समिती आळंदीकर ग्रामस्थ अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांनी समितीचे वतीने दिली. या साठी मंदिरात एक ठराविक जणांची संवाद बैठक झाली. या बैठकीत संबंधित घटकांचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने