पंतप्रधानांना शहरातून दोन लाखांंपेक्षा जास्त नागरिक हातात दिवे घेऊन रेकॉर्ड ब्रेक शुभेच्छा/ आशीर्वाद देणार
पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महिनाभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये आशीर्वादाचा दिवा, रोजगार मेळावे, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्वप्नाचा भारत, चित्रकला, भाषण, नमो सेवा गाथा, अंगणवाडी सेविका सन्मान, विकास कामांची रील स्पर्धा, सेवादीप यात्रा, सेवा व आपले योगदान, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज, जनसेवेचा महाकुंभ..!असे मोठ्या प्रमाणात विविध समाज उपयोगी सेवाभावी उपक्रम राबवले जाणार आहेत.
१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे
त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार ,आजी-माजी नगरसेवक,सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व शहरातील नागरिकांच्या वतीने आशीर्वादाचा दिवा म्हणून हातात दिवा घेऊन मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत व हा उपक्रम रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात अत्यंत नियोजित स्तुत्य नियोजन केले आहे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे आशीर्वादाचा दिवा या अभियानाचे शहर संयोजक आहेत
शहर प्रभारी भरत नाना पाटील,
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर भाऊ जगताप,महेश दादा लांडगे, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, मा आमदार अश्विनीताई जगताप ,सेवा संकल्प अभियानाचे प्रमुख व महामंत्री मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडेय, महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी यांच्यासह शहरातील विविध आघाड्या, मोर्चे प्रकोष्ट व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या अभियानात सक्रिय सहभाग घेणार आहेत, यासाठी विधानसभा समिती सुद्धा नियुक्त केलेले आहे
चिंचवड विधानसभा: जोशना कलाटे, भरत ठाकूर,स्वाती जाधव,
भोसरी विधानसभा: गीता महेंदू, गायत्री तळेकर, चित्रा अभंग,
पिंपरी विधानसभा: महेंद्र बाविस्कर, अनघा रुद्र, राखी अर्जुन यांच्यासोबत शहरातील सर्व मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, हर्षद नढे, सनी बारणे, सोमनाथ तापकीर मोहन राऊत, शिवराज लांडगे, प्रमोद परदेशी ,अजय साने रामदास कुटे,अजित बुर्डे,
अनिता वाळुंजकर, जयदीप खापरे,मंगेश धाडगे,धरम वाघमारे आदी सक्रिय सहभाग घेणार आहेत, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनीही १७ सप्टेंबर रोजी आपल्या हातात दिवा घेऊन मोदीजींना शुभेच्छा पर आशीर्वाद द्यावे असे विनम्र आवाहन करीत आहोत.

