PC CITY PRO साजरा करणार मुख्य प्रवाहातील पत्रकारांचा वाढदिवस!
पिंपरी चिंचवड :- सिविक मिरर चे प्रतिनिधी पत्रकार विकास शिंदे यांचा वाढदिवस केक कापून PIMPRI CHINCHWAD CITY PRO व पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षात (दि.५)साजरा करण्यात आला. भारतीय संविधान यावेळी त्यांना भेट देण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे, प्रविण शिर्के, विकास गायकांबळे,PC CITY PRO चे मुख्य सुरज साळवे, सायली कुलकर्णी, शहनाज कुरणे,पत्रकार दिलीप देहाडे, संतोष जरड, युनूस खतीब, श्याम सोनोने, मुकेश जाधव, गणेश शिंदे, निलेश सायंकर, पंकज लालझरे आदी पत्रकार उपस्थित होते.
विकास शिंदे यांचे पत्रकार क्षेत्रातील काम वाखाणण्या जोगे आहे.शोध पत्रकारितेला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे.पत्रकारांचा वाढदिवस PC CITY PRO च्या वतीने साजरा करण्याचा उपक्रम अभिमानास्पद आहे असे बोलून जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी विकास शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याला अनुसरून विकास शिंदे सर काम करत असतात. शोध पत्रकारितेत तरुण पत्रकारांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.महानगरपालिकेतील बातमीच्या मागील बातमी शोधण्याचे कौशल्य त्यांच्या मध्ये आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व समाजातील अन्याय, अत्याचाराला त्यांच्या लेखणीतून न्याय मिळावा ही अपेक्षा! वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील मुख्य प्रवाहातील पत्रकारांचा वाढदिवस या पुढे PC CITY PRO व पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येईल अशी भूमिका PC CITY PRO चे मुख्य सुरज साळवे यांच्या वतीने घेण्यात आली.
