MGID Header Code
Code End

PCMC : सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांचा १८१ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

 


पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : पवनानगर, चिंचडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयातील उपासना केंद्रात सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांचा १८१ वा जन्मोत्सव दिनांक २७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक वातावरणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

ब्रह्मचैतन्य महाराज सेवा संप्रदाय आरती मंडळाची स्थापना सन १९९५ मध्ये सर्वश्री रमेश कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, निळकंठ कुलकर्णी, अतुल कुलकर्णी व अच्युत कुलकर्णी या पाच साधकांनी केली. त्यानंतर काशीधाम मंगल कार्यालयाचे मालक पांडू काका कुलकर्णी यांच्या प्रेरणा व विनंतीमुळे सन २००० पासून हे उपासना मंडळ काशीधाम मंगल कार्यालयात नित्यनियमाने सुरू करण्यात आले.

तेव्हापासून दरवर्षी काकड आरती, उपासना, कीर्तन, प्रवचन, सेवा, नामजप शिबिर, गुरुपौर्णिमा उत्सव तसेच विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सध्या या सेवा आरती मंडळाचे उपाध्यक्ष निळकंठ दांडेकर हे आहेत.

जन्मोत्सवानिमित्त सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पादुका मिरवणूक, विष्णू सहस्रनाम, सद्गुरु लीलामृत पारायण, दासबोध व चक्री पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याचबरोबर सुमारे १०,००० भाविकांना अन्नदान करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने