भाविक उपासक - अभ्यासकांचा उत्साही प्रतिसाद
मराठी - हिंदी - संस्कृत - इंग्रजी भाषेत कीर्तने ;
उपासक - अभ्यासकांचा परिसंवाद स्तुत्य उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदी यांचे वतीने बहुभाषिक कीर्तन महोत्सवाचे आयोजन 12 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाची सांगता 19 एप्रिल 2026 रोजी काल्याचे कीर्तनाने होणार असल्याची माहिती जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी बहुभाषिक कीर्तन महोत्सवाची सविस्तर माहिती देत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे श्री ज्ञानेश्वरी एक परिवारातील घटक प्रा. श्रीधर घुंडरे पाटील, अर्जुन मेदनकर उपस्थित होते.
या वेळी पुढे माहिती देताना डॉ. गेठे महाराज म्हणले, आळंदी पंचक्रोशीत जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षा पासनू अध्यात्मिक क्षेत्रात संत विचारांचा प्रचार व प्रसाराचे सेवा कार्य करत आहे. मराठी भाषते असणारे सतं साहित्य विविध भाषते आणि लोकां पर्यंत पोहोचावे यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतं वाङ्मयाचे मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांत ग्रथं अनुवाद करण्याचे कार्य सरूु आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान मराठी, हिंदी. आणि इंग्रजीत भाषांतरित करून ग्रथं रूपाने प्रकाशित केलेलेआहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथ ही इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेलेआहेत. संत मुक्ताई यांचे ताटीचे अभंग या वरही मराठी भाषते ग्रंथ प्रकाशित झाला आहे. तसेच श्री संत मुक्ताबाईं महाराज यांच्या ताटीच्या अभंगांची आणि त्यावर केलेल्या भाषाचा
इंग्रजीतही अनुवाद झालेला आहे परंतु तो ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पुणे, भोसरी, पिंपरी चिंचवड परिसरात श्रीमद् भगवद्गीता ज्ञानेश्वरी उपनिषदे यांचे अध्यापन पारंपारिक पाठ पद्धतीने डॉक्टर- इंजि नि यर- वकील -शि क्षक इत्यादी बुद्धिजीवी वर्गा साठी कार्य सरूु आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर यवुकांच्या नैतिक मूल्य संवर्धनासाठी प्रेरणादायी व्याख्यानही वेळोवेळी आयोजित केले जातात .युवक, युवतींच्या संस्कार संवर्धनासाठी दिवाळी, उन्हाळी संस्कार शिबिरांचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील प्रौढांना आळंदी
-पढंरपूर, नाशिक, -त्रबं केश्वर, पुणतांबे आदी तीर्थक्षेत्रात जाऊन तेथील विद्वानांच्या माध्यमातून अध्यात्मिक, सांस्कृतिक प्रबोधन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज हेच एक कुटुंब ही संकल्पना त्यांच्या मध्ये रुजवली जाते. विद्यार्थ्यांच्या मूल्य संवर्धनासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना केंद्र स्थानी ठेवनू “ओळख श्री ज्ञानेश्वरी ची “आणि “ओळख श्री हरि पाठाची” हा संस्कारक्षम उपक्रम राज्यातील शाळां मध्ये राबविला जात आहे. शालेय विद्यार्थी केंद्रस्थानी माननू ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले जीवनमूल्य 34 पाठांच्या स्वरूपात 300 पानांचेओळख श्री ज्ञानेश्वरीचे हे मार्गदर्शक संदर्भ पुस्तक प्रकाशित केले आहे. सध्या हा उपक्रम महाराष्ट्रात 160 शाळांच्या मध्ये अत्यतं उत्साहात सुरु आहे. हा उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, पत्रकार संघ आळंदी, अध्यापक महाराज मंडळी यांच्या माध्यमातून सुरु आहे. युवक युवती यांचे साठी भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यांचे ज्ञान देण्यास प्रतिष्ठानच्या वतीनेआळंदी येथे बहुभाषिक प्रशिक्षण केंद्र मोफत सुरु आहे. संत विचार हे सुख, समाधान, शांती, समानता आणि विश्व बंधुत्व त्याच प्रमाणे सामाजिक समरसता शिकवणारेआहेत. हे संत वि चार प्रगट
करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे कीर्तन हे संतांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे. श्री संत नामदेव महाराज म्हणतात - नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जगात ज्ञानाचा दीप लावण्यास कीर्तन हे उत्तम माध्यम आहे. संत विचार विश्वात जावे या करता विश्वाची व्यवहार भाषा इंग्रजी आहे म्हणनू इंग्रजी भाषत देखील कीर्तनाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या निमित्ताने संत विचार विश्वामध्ये जावेत हा मुख्य उद्देश ठेवून बहुभाषिक कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत कीर्तन सेवा होत आहे. सुमारे 15 मान्यवर कीर्तनकार हि सेवा रुजू करीत आहेत. अभ्यासक आणि उपासक तसेच भाविक, नागरिक यांनी या बहुभाषिक कीर्तन महोत्सवातील उपक्रमात सहभागी होऊन श्रावण सुखाची अनुभूती घ्यावी असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. बहुभाषिक कीर्तन महोत्सव गेल्या पाच वर्षां पासनू प्रति वर्षी आळंदीत यशस्वी रित्या होत आहे. यावर्षी बहुभाषिक कीर्तन महोत्सव 12 ते 19 एप्रि ल 2026 या काळात होत आहे. महोत्सवाची सुरुवात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांचे इंग्रजी तीळ कीर्तनास सेवेने झाली. 19 एप्रिल रोजी डॉ. सुभाष महाराज गेठे यांचे काल्याचे कीर्तन महाप्रसाद वाटप सेवेने सांगता हरिनाम गजरात होईल. या महोत्सवात
शांतीब्रह्म ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, डॉ. अभय टिळक आदी मान्यवरांची कीर्तन सेवा होणार आहे.
हा बहुभाषिक कीर्तन महोत्सव महोत्सव महाराष्ट्रात प्रथमच गेल्या पाच वर्षां पासून श्री क्षेत्र आळंदी येथील जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे. यावर्षी बहुभाषिक कीर्तन सेवे बरोबर सावित्रीबाई फुले पुणे विध्यापिठ अंतर्गत तत्त्वज्ञान विभाग आणि संस्कृत विभागातील विद्वान प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांचा अभ्यासक उपासक परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला आहे. या सह ज्ञान, भक्ती साधना, संगीत भजन आदी उक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे म्हणाले, या बहुभाषिक कीर्तन महोत्सवात भाविक, नागरिक, अभ्यासक, साधक, उपासक यांनी सहभागी होऊन महोत्सवात सहभागी व्हावे.
आळंदीत बहुभाषिक कीर्तन महोत्सवाच्या आयोजन
येथील जाण काही वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान च्या वतीने वेदांत भवन हनुमानवाडी केळगाव आळंदी देवाची येथे बहुभाषिक कीर्तन महोत्सव आयोजन 12 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत करण्यात आले आहे या बहुभाषिक कीर्तन महोत्सवात इंग्रजी हिंदी संस्कृत मराठी या चार भाषांमध्ये साधक अभ्यासक कीर्तनकार प्रवचनकार भाविक नागरिकांना कीर्तन श्रवणाची संधी मिळत आहे.
या कीर्तन महोत्सवाचे आयोजन जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह. भ. प. सुभाष महाराज गेठे यांनी केले आहे. या बहुभाषिक कीर्तन महोत्सवात पहाटे काकडा, विष्णु सहस्रनाम, गाथा निरूपण, दुपारी दोन वाजता बहुभाषिक कीर्तन, परिसंवाद, हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन सेवा होणार आहे. या महोत्सवात सिन्नर, कोपरगाव, चांदवड, राहता, अकोले, खेड, संगमनेर, येवला या तालुक्यातील भाविक, नागरिक सहभागी होत आहेत.
१५ एप्रिल रोजी संगीत भजन, १६ एप्रिल रोजी अध्यात्म प्रवासातील अनुभव कथन होत आहे. या सत्राचे अध्यक्ष भागवत साळुंखे राहणार आहे. १७ एप्रिल रोजी अभिव्यक्ती परिसंवाद मध्ये अनिल माल्लेवार सत्राचे अध्यक्ष राहतील. १८ एप्रिल रोजी अभ्यासक परिसंवादात उपासक संवादात परिसंवधूल. ह भ प सुभाष महाराज देठे यांच्या काल्याच्या किर्तन सेवेने या बहुभाषिक कीर्तन महोत्सवाचे सांगता होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी दिली.
बहुभाषिक किर्तन महोत्सवामध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, वासुदेव महाराज शेवाळे, डॉ. अभय टिळक, मंगेश महाराज कदम, मुकुंद महाराज पांचाळ यांची इंग्रजी मधून, वैभव महाराज राक्षे, कैलास खंडागळे यांची हिंदीतून, सुभाष महाराज गेठे आणि हनुमान महाराज चैतन्य यांची संस्कृत मधून कीर्तन सेवा होत आहे. तसेच मराठीतून आत्माराम महाराज कुटे, भाऊसाहेब झुरुळे, पद्माकर पाटोळे, मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, उल्हास सूर्यवंशी यांची कीर्तने होत आहेत. महोत्सवात काल्याचे कीर्तन सुभाष महाराज गेठे यांच्या कीर्तनाचा समावेश आहे.
