MGID Header Code
Code End

कवी ना. धो. महानोर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

 


पिंपरी चिंचवड :  मराठी साहित्यविश्वात आपल्या संवेदनशील लेखणीने माती, निसर्ग, शेती आणि कष्टकरी जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.  यावेळी कष्टकरी, कामगार उपस्थित होते.

या नभाने या भुईला दान द्यावे,आणि या मातीतून चैतन्य गावे.कोणती पुण्ये अशी येती फळाला,जोंधळ्याला चांदणे लगडून जावे..

 अशा  अनेक काव्यपंक्ती ग्रामीण जीवनातील सुख-दुःख, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जगण्यातील संघर्ष आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर आणणाऱ्या ना. धों. महानोर यांचे साहित्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत.

थोडे नवीन जरा जुने